चॉकलेट मूस (व्हेज) / chocolate mousse (veg)




साहित्य-
१. फ्रेश क्रीम २०० मि.ली
२. डार्क चॉकलेट १२ क्युब्स
३. साखरेची पूड ३ चमचे
४. ड्रिंकिंग चॉकलेट १ चमचा 

कृती-
फ्रेश क्रीम व साखरेची पूड इलेक्ट्रिक बिटरच्या सहाय्याने बिट करावे. इलेक्ट्रिक बिटर नसेल तर एग बिटरने जवळपास अर्धा तास हाताने बिट करावे. क्रीम पूर्णपणे हलके होईपर्यंत बिट करावे. आता त्याच्या तीन भागातील एक भाग वेगळा काढावा. एका भांड्यात पाणी गरम करावे. एका छोट्या काटोरीत चॉकलेट घेऊन ती कटोरी गरम पाण्यावर ठेऊन चॉकलेट वितळेपर्यंत ढवळावे. वितळलेकी लगेच काढून पूर्णपणे थंड करून घ्यावे. आता क्रीमचे उरलेले २ भाग क्रीम मध्ये चॉकलेट मिक्स करावे. एका काचेच्या सर्व्हिंग ग्लास मध्ये खाली चॉकलेट क्रीम टाकावे. आता क्रीम चा वेगळा काढलेला भाग पायपिंग bag मध्ये भरून तो वरून ग्लास मध्ये पसरवावा. आता चहा गाळणीत ड्रिंकिंग चॉकलेट टाकून वरून थोडेसे शिंपडावे. असे सर्व ग्लास भरून घ्यावे. ४ तास फ्रीज मध्ये सेट करण्यास ठेवावे. व थंडच सर्व्ह करावे. 

Comments