पाणी पुरी / pani puri




साहित्य-
१. रवा दीड वाटी
२. मैदा १ चमचा  
३. मीठ चवीनुसार
४. काळे मीठ १ चमचा
५. आमचूर पावडर १ चमचा
६. आले एक छोटा तुकडा
७. जिरे अर्धा चमचा
८. जिरेपूड १ चमचा
९. पुदिना १ वाटी
१०. कोथिंबीर अर्धी वाटी
११. शोप दीड चमचा
१२. तेल तळण्यासाठी
१३. चाट मसाला अर्धा चमचा
१४. मिरच्या ४
१५. उकडलेले बटाटे ३
१६. पातीचा कांदा २
१७. कांदा १
१८. चिंच अर्धी वाटी
१९. गुळ ४ चमचे
२०. तिखट अर्धा चमचा 

कृती-
रवा, मैदा, मीठ एकत्र करून थंड पाण्याने भिजवून गोळा करून अर्धा तास मुरण्यास ठेवावा. उकडलेल्या बटाट्यात १ कांदा चिरून टाकावा, १ चमचा कोथिंबीर टाकून मिश्रण एकत्र करून ठेवावे. चिंच अर्धा तास भिजवून ठेऊन त्याचा कोळ काढून घ्यावा. आता एका पातेल्यात १ ग्लास पाणी गरम करण्यास ठेवावे. त्यात चिंचेचा कोळ, गुळ, मीठ, तिखट टाकून उकळी येऊ द्यावी. हे पाणी थंड होऊ द्यावे. आता तिखट पाणी बनवण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात पुदिना, मिरच्या, कोथिंबीर, शोप, जिरे, आले बारीक वाटून घ्यावे. हे वाटण २ ग्लास थंड पाण्यात मिक्स करावे. त्यात चवीनुसार मीठ, काळे मीठ, आमचूर पावडर, जिरेपूड, चाट मसाला टाकून मिक्स करावे.
       भिजवलेला गोळा घेऊन त्याला पीठ लावून, त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटाव्या अथवा एक मोठी पोळी लाटावी. व छोट्या डबीच्या झाकणाच्या सहाय्याने गोल गोल पुऱ्या कापून घ्याव्या. एका कढईत तेल गरम झाल्यावर पुऱ्या दोन्ही बाजूंनी लाल तळून घ्याव्या. सर्व पदार्थ एका प्लेट मध्ये सर्व्ह करावे. सोबत पातीचा कांदा चिरून द्यावा.

Comments