मक्के दी रोटी सरसों दा साग / makki di roti sarson da saag




साहित्य -
१. मोहरीची पाने (सरसों) अर्धा किलो
२. पालक १ वाटी
३. टमाटे २
४. आले एक छोटा तुकडा
५. लसूण ५ पाकळ्या
६. गरम मसाला अर्धा चमचा
७. तिखट चवीनुसार
८. मीठ आवश्यकतेनुसार
९. मक्याचे पीठ ५ वाट्या
१०. तेल ४ चमचे
११. बटर पाव वाटी
१२. जिरे पाव चमचा
१३. कांदे २
१४. कोथिंबीर अर्धी वाटी  

कृती -
पालक व सरसों धून घ्यावा. एका भांड्यात २ कप पाणी घेऊन त्यात झाकण ठेऊन उकळत ठेवावा. ५ मिनिटे उकळल्यावर थंड होऊ द्यावा. एका मिक्सरच्या भांड्यात टमाटे, लसूण, आले टाकून बारीक पेस्ट करून वेगळी काढून घ्यावी. आता त्याच भांड्यात पालक व सरसों टाकावा. २ चमचे मक्याचे पीठ टाकावे व बारीक पेस्ट करून घ्यावी. एका भांड्यात तेल गरम करावे. त्यात जिरे व बारीक चिरलेला कांदा परतवून घ्यावा. आता त्यात टमाट्याची पेस्ट टाकून गरम मसाला व तिखट टाकावे. आता तेल सुटेपर्यंत परतत राहावे. नंतर पालक व सरसोंची पेस्ट, मीठ टाकून झाकून ५ मिनिटे होऊ द्यावे.  भाजी शिजल्यावर gas बंद करून कोथिंबीर टाकावी. मक्याची पोळी करण्यासाठी एका परातीत मक्याचे पीठ घेऊन त्यात मीठ व एक चमचा तेल टाकून थंड पाण्याने भिजवावे. जास्त घट्ट करू नये. कणिक सैलसरच भिजवावी. व चांगली मळून घ्यावी. आता त्याच्या पोळ्या लाटुन तव्यावर दोन्ही बाजूनी तेल सोडून भाजून घ्याव्या. खायला देताना गरमच वाढाव्या. सर्व्ह करताना भाजीवर व पोळीवर बटर द्यावे.   

Comments