भरली वांगी / stuffed baingan


साहित्य-
१. वांगी ४ मध्यम आकाराची
२. कांदा १
३. भाजलेल्या दाण्याचे कुट २ चमचे
४. भाजलेल्या खोब्राचे कुट २ चमचे
५. भाजलेल्या तिळाचे कुट १ चमचा
६. गोडंबीचे कुट १ चमचा
७. लसूण ५ पाकळ्या
८. आले एक छोटा तुकडा
९. गरम मसाला १ चमचा
१०. चिंचेचा कोळ १ चमचा
११. गुळ १ चमचा
१२. मीठ चवीनुसार
१३. तिखट २ चमचे
१४. हळद पाव चमचा
१५. तेल ४ चमचे
 
कृती-
प्रथम कांदा, सर्व कुट, लसूण, आले, गरम मसाला, चिंचेचा कोळ, गुळ, मीठ, तिखट, हळद हे सर्व मिक्सर मध्ये बारीक करून घेणे. वांगी धून त्याच्या देठाच्या विरुद्ध बाजूने अर्धवट २ चिरा माराव्या. आता त्यात वाटलेला मसाला भरावा. उरलेला राहू द्यावा. एका पातेल्यात तेल गरम करून त्यात ही वांगी अलगद सोडावी. व झाकणावर पाणी ठेऊन मंद gas वर १० मिनिटे शिजू द्यावी. मग वांगी पालटवून परत ५ मिनिटे होऊ द्यावी. शिजत आली की उरलेला मसाला टाकून अलगद ढवळावे. २ मिनिटे झाकण न ठेवता होऊ द्यावे. मग गरमच भाकरी बरोबर वाढावे.

Comments