पनीर बॉल्स / paneer balls


साहित्य-
१. पनीर २०० ग्रॅम
२. ब्रेडचे ४ स्लाईस
३. मीठ चवीनुसार
४. बटाटा १
५. हळद पाव चमचा
६. मैदा ५ चमचे
७. मिरच्या ५
८. तेल तळण्यासाठी
९. कोथिंबीर ४ चमचे

कृती-
बटाटा उकडून घ्यावा. २ ब्रेडचे स्लाईस मिक्सर मध्ये बारीक करून घ्यावे. मैदा थोड्या पाण्यात मिसळून जाडसर पेस्ट करून घ्यावी. मिरच्यांची पेस्ट करावी. आता पनीर, बटाटा कुस्करून घ्यावा. त्यात २ ब्रेडचे स्लाईस, मीठ, हळद, मिरची पेस्ट, कोथिंबीर टाकून एकत्र करून त्याचे गोल लिंबा एवढे गोळे करून घ्यावे. हे गोळे मैद्याच्या पेस्ट मध्ये डुबवून ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून घ्यावे. हाताने अलगद दाबून चुरा गोळ्यांना चिटकवून घ्यावा. हे गोळे चांगल्या तापलेल्या तेलात लालसर तळून घ्यावे. सॉस बरोबर खायला द्यावे.

Comments