हक्का नूडल्स / hakka noodles


साहित्य-
१. हक्का नूडल्स चे एक पाकीट
२. शिमला मिरच्या २
३. कांदे ३
४. पत्ता कोबी २ वाट्या
५. tomato २
६. अजिनोमोटो १ चमचा
७. फरसबी अर्धी वाटी
८. मीठ चवीनुसार
९. तिखट आवश्यकतेनुसार
१०. tomato सॉस ४-५ चमचे
११. सोया सॉस ४-५ चमचे
१२. रेड चिली सॉस १ चमचा
१३. तेल ३ चमचे
१४. पाणी ६ कप
१५. लसूण पाकळ्या ६-७
 
कृती-
एका भांड्यात पाणी गरम करण्यास ठेवावे. पाण्याला उकळी आल्यावर नूडल्स टाकून ५ मिनिटे शिजू देणे. नूडल्स दाबून बघावे. शिजल्यास चाळणीत काढून त्यावर थंड पाणी टाकून नूडल्स ला हलक्या हाताने अर्धा चमचा तेल लावावे. सर्व भाज्या लंब्या चिरून घ्याव्या. एका कढईत तेल घेऊन त्यात चिरलेला लसूण टाकून त्यावर कांदा टाकून होऊ द्यावा. आता gas मोठा करून फरसबी, tomato , शिमला मिरची, कोबी, अर्ध्या अर्ध्या मिनिटाच्या अंतराने टाकावे. व ढवळत राहावे. मग तिखट, अजिनोमोटो टाकून नूडल्स टाकावे. सर्व सॉस, मीठ टाकून नीट एकत्र करून घ्यावे. गरमच सर्व्ह करावे.    


Comments