बीट मसाला दोसा / beet masala dosa


साहित्य-
१. दोस्याचे तयार पीठ अर्धा किलो
२.  बटाटे २
३. कांदा १
४. कोथिंबीर अर्धी वाटी
५. लसूण पाकळ्या ३
६. आले एक छोटा तुकडा
७. मोहरी पाव चमचा
८. जिरे पाव चमचा
९. हळद पाव चमचा
१०. साखर पाव चमचा
११. मिरच्या ३-४
१२. बीट १
१३. चीज (हवे असल्यास) ३-४ क्युब्स
१४. बटर आवश्यकतेनुसार
१५. मीठ आवश्यकतेनुसार
१६. तेल ४ चमचे 
१७. कढीपत्ता ४-५ पाने
 
कृती-
प्रथम बटाटे व बीट कुकर मध्ये उकडून घ्यावे. बटाट्याची साले काढून चांगले कुस्करून घ्यावे. बीट चे देखील साले काढून घ्यावीत. एका कढईत तेल तापवून मोहरी व जिरे तडतडू द्यावे. आता त्यात कढीपत्ता, मिरचीचे तुकडे, टाकून लंबा चिरलेला कांदा टाकून होऊ द्यावा. लसूण आल्याची पेस्ट टाकावी. हळद, साखर, व कुस्करलेले बटाटे घालून चांगले ढवळून घ्यावे. आता मीठ व कोथिंबीर घालून gas बंद करून भाजी काढून घ्यावी.
एका वाटीत पाणी घेऊन त्यात अर्धा चमचा मीठ टाकून ढवळून घ्यावे. नॉनस्टिक तव्यावर अर्धा चमचा तेल सोडून ते तेल अर्ध्या चिरलेल्या कांद्याने किंवा बटाट्याने पसरवून घ्यावे. आता हाताने ते मिठाचे पाणी थोडेसे तव्यावर शिंपडावे. ह्या पाण्याची वाफ झाली कि त्यावर दोस्याचे पीठ माधाभागी वाटीने टाकून हळू हळू बाहेरील बाजूस गोलाकार पसरवत जावे. बारीक gas वर २ मिनिटे होऊ द्यावे. आता त्यावर तयार केलेली बटाट्याची भाजी उलत्न्याने व्यवस्थित पूर्ण दोस्यावर पसरवून घ्यावी. त्यावर थोडेसे बीट किसून ते देखील पसरवून घ्यावे. आता त्यावर चीज किसून टाकावे. व वरून बटर सोडावे. 

टीप-
लहान मुले बीट खात नाहीत. त्यांना अश्याप्रकार बीट दिल्यास त्याचा वास व उग्र चव लागत नाही व ते आवडीने खातात. हा पदार्थ त्यांना डब्यातही देता येतो.

Comments