डाळ मेथी / dal methi


साहित्य-
१. मेथी १ वाटी
२. तुरीची डाळ १ वाटी
३. मिरच्या २-३
४. लसूण पाकळ्या ६
५. आल्याची पेस्ट अर्धा चमचा
६. tomato १
७. कांदा १
८. मोहरी पाव चमचा
९. जिरे पाव चमचा
१०. हळद पाव चमचा
११. तिखट १ १/२ चमचा
१२. तेल ५-६ चमचे
१३. पाणी आवश्यकतेनुसार
१४. मीठ चवीनुसार

कृती-
डाळ पाण्यात २-३ तासांसाठी धून भिजवून ठेवावी. एका पातेल्यात तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे तडतडल्यावर त्यात चिरलेली मिरची, लसून, कांदा टाकून होऊ द्यावे. मग आल्याची पेस्ट, चिरलेला tomato , मेथी, हळद, तिखट टाकून परतवून घ्यावे. आता भिजलेली डाळ पाण्यासकट टाकावी. मीठ टाकून मिडीयम gas वर झाकण ठेऊन शिजू द्यावे. १०-१५ मिनिटाने झाकण काढून डाळ शिजली का ते पाहावे. (डाळ जास्त शिजायला नको. अक्खी डाळ राहील इतपतच शिजवावे) आवश्यकता वाटल्यास पाणी टाकावे. ही डाळ गरम गरम भाकरी व भाताबरोबर वाढावी.

Comments