कारल्याचे चिप्स / karela chips


साहित्य-
१. कारले १
२. मीठ २ चमचे
३. तळण्यासाठी तेल
४. गरम मसाला अर्धा चमचा
५. पाणी धुण्याकरिता

कृती-
कारल्याचे पातळ, गोल काप करून घ्यावे. त्याला मीठ लावून २-३ तास ठेऊन द्यावे. त्याला सुटलेले पाणी काढून टाकावे. त्यात २ कप पाणी टाकून चोळून धून घ्यावे. परत एकदा असेच धुवावे. मग सर्व पाणी पिळून कारली कोरडी करून घ्यावी. एका कढईत तेल चांगले गरम करावे. gas बारीक करून त्यात कारले सोडून खरपूस तळून घ्यावे. व त्यावर गरम मसाला टाकून हलक्या हाताने मिक्स करून खायला द्यावे.

टीप-
१. कारली चांगली काळपट लाल तळावी म्हणजे कुरकुरीत लागतात.
२. ही कारली जेवताना तोंडी लावण्याकरिता करतात.
३. कारली वेळेवरच तळावी. पावसाळ्यात ती नरम पडण्याची शक्यता असते.

Comments