फोडणीचे मुरमुरे / murmura snack


साहित्य-
१. मुरमुरे ४ वाट्या
२. कांदा १
३. कढीपत्ता ५-६ पाने
४. कोथिंबीर पाव वाटी
५. मोहरी पाव चमचा
६. जिरे पाव चमचा
७. हळद पाव चमचा
८. साखर पाव चमचा
९. तेल ३ चमचे
१०. बारीक शेव सजावटीकरिता
११. सुक्या खोब्र्याचा कीस सजावटीकरिता
१२. मिरच्या ४

कृती-
कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता तडतडू द्यावा. मग मिरच्या, चिरलेला कांदा होऊ द्यावा. कांदा होत असताना मुरमुरे भिजवून घ्यावे. मुरमुरे भिजवण्यासाठी ते एका भांड्यात घेऊन त्यावर पाणी शिंपडत ढवळत जावे. चांगले भिजू द्यावे. कांदा झाल्यावर त्यात हळद, साखर टाकून मुरमुरे टाकावे. १ मिनिट ढवळावे. कोथिंबीर टाकून gas बंद करावा. सर्व्ह करताना बारीक शेव व खोब्र्याच्या किसाने सजवावे.  

Comments