मिक्स डाळींचे वडे/mix dal vada-




साहित्य-
१. मुग डाळ सालींसकट १ वाटी
२. उडीद डाळ १/२ वाटी
३. तूर डाळ २ चमचे
४. बर्बटीचे डाळ ४ चमचे
५. मसूर डाळ २ चमचे
६. अख्खे धने ३ चमचे
७. मेथीची भाजी १ १/२  वाटी
८. पातीचा कांद्याची पात पाऊण वाटी
९. मीठ चवीनुसार
१०. मिरच्या ७-८
११. लसूण ४-५ पाकळ्या
१२. तळण्यासाठी तेल
कृती-
सर्व डाळी आदल्या रात्री पाण्यात भिजवून ठेवणे.  मग सकाळी जाडसर वाटणे. त्यात धने थोडे कुटून घालणे (काहीजण अख्खे धने देखील घालतात). मेथीची भाजी, कांद्याची पात चिरून त्यात टाकणे. मीठ व मिरची लसूण ची पेस्ट टाकणे. चांगले मिक्स करणे. तेल तापत ठेवणे. मिश्रणाचे लिंबा एवढे गोळे करून ठेवणे. तेल तापल्यावर ते गोळे अलगद तेलात सोडणे. व लगेच काढून घेणे. असे करून सर्व गोळे तळून घेणे. आता एक एक गोळा एका हातावर घेऊन दुसऱ्या हाताच्या तळव्याने त्याच्यावर दाब देऊन ते गोळे चपटे करून घेणे. आता चपटे झालेले वडे तेलात सोडून सोनेरी तळून घेणे.
टीप-
पाहुणे येणार असल्यास पहिले आपण तयार केलेले गोळे तळून ठेवणे. व वेळेवर तेल गरम करून ते गोळे चपटे करून तळणे. म्हणजे सर्वांना गरम गरम वाढता येतील व पटकन होतील. हे वडे पुदिन्याच्या किंवा दह्याच्या चटणी बरोबर खायला चांगले लागतात. तसेच कढी बरोबर पण खाता येईल. 

Comments