आंबोळी/amboli


साहित्य-
१. १ किलो तांदूळ
२. १ पाव सालांसकट उडीद डाळ
३. मेथी दाने २ चमचे
४. मिरच्या ७-८
५. लसूण ७-८ पाकळ्या
६. आंबट ताक भिजवण्यापुरते
७. मीठ चवीनुसार
कृती-
प्रथम तांदूळ, उडीद डाळ व मेथी दाने दळून आणावे. आता गरजेनुसार पीठ घेऊन ते आंबट ताकाने ढोकळ्यासारखे भिजवावे. त्यात लसूण मिरचीची पेस्ट, मीठ टाकावे. एका फ्राईंग pan वर २ चमचे तेल सोडून त्यावर ह्या मिश्रणाचे ३ छोटे छोटे दोसे टाकावे व gas मंद करून २ मिनिटांकरिता झाकण ठेऊन द्यावे. २ मिनिटांनी झाकण काढून हे दोसे पलटवावे. अजून २ मिनिटांनी काढून घ्यावे व सॉस बरोबर सेर्व्ह करावे.

Comments