शेजवान गोबी पकोडा/shejvan gobi pakoda


साहित्य-
१. पत्ता कोबी एक वाटी
२. मैदा एक वाटी
३. cornflour २ चमचे
४. अजिनोमोटो १/२ चमचा
५. गाजर बारीक लंबे चिरून पाव वाटी 
६. फरसबी च्या शेंगा ३
७. कांदा १
८. शेजवान सॉस पाव वाटी
९. tomato सॉस 3 चमचे
१०. सोया सॉस २ चमचे
११. सिमला मिरची १ छोटी
१२. मीठ चवीनुसार
१३. तिखट चवीनुसार
१४. तेल तळण्यासाठी
१५. खाण्याचा लाल रंग
१६. लसूण ४ पाकळ्या
१७. आले छोटा तुकडा

कृती-
पत्ता कोबी बारीक चिरून एका बाउल मध्ये काढणे. त्यात मीठ, मैदा, अर्धे अजिनोमोटो टाकून पाण्याने गोळे बनतील इतपत भिजवून घेणे. एका काढईत तेल तापवून त्यात ह्याचे छोटे छोटे गोळे करून पकोडे सोनेरी तळून घेणे. व बाजूला ठेवणे. एका वाडग्यात अर्धा ग्लास पाणी घेऊन त्यात cornflour , तिखट, खाण्याचा रंग, सोया सॉस, tomato सॉस, सेजवान सॉस चांगले मिक्स करणे. हे मिश्रण सुद्धा बाजूला ठेवणे. आता एका पातेल्यात ३ चमचे तेल गरम करून त्यात बारीक लांब चिरलेला कांदा टाकून होऊ देणे. कांदा झाल्यावर, त्यात बारीक चिरलेला लसूण व आले टाकून थोडे होऊ देणे. मग गाजर, चिरलेल्या फरसबीच्या शेंगा, चिरलेली शिमला मिरची, अजिनोमोटो टाकून थोडेसे परतणे.  आता आपण आधी तयार केलेले मिश्रण यात टाकून मीठ टाकणे. व थोडे शिजू देणे. हे सूप दाटसर होऊ देणे. जरूर पडल्यास आणखी थोडे पाणी टाकणे. उकळी आल्यावर बंद करणे व त्यात कोबीचे पकोडे सोडून गरम गरम सेर्व्ह करणे.  

Comments