साईचा केक/cream cake

साहित्य 
१. मैदा १ १/२ वाटी
२. दुधाची साय १ वाटी
३. पिठीसाखर २ वाटी
४. दुध १ वाटी
५. milk powder १ १/२ वाटी
६. cornflour पाव वाटी
७. खायचा सोडा अर्धा चमचा
८. baking powder पाव चमचा
९. vanilla essence १/२ चमचा
१०. लोणी २ चमचे
११. dryfruits
१२. काळ्या मनुका
कृती-
कॅरेमल -
चार चमचे साखर जाड बुडाच्या भांड्यात टाकावी, गरम करताना मंद Gas वर सतत ढवळणे. पूर्ण साखर विरघळली की,  पाव वाटी पाणी गरम करून त्यात ओतणे. परत Gas वर ठेवून पातळ करणे. मग पूर्ण गार होऊ देणे.
केक चा बेस-
एका पातेल्यात दूध घेणे. त्यात मिल्क पावडर व पिठी साखर टाकून नीट  ढवळणे. त्यात essence , साय , लोणी टाकणे. मैदा व cornflour चाळून त्यात टाकत ढवळत जाणे. शेवटी baking powder , खायचा सोडा , आपण तयार केलेले कॅरेमल , dryfruits ,  काळ्या मनुका टाकून चांगले फेटणे.
केकच्या भांड्याला तूप व्यवस्थित पसरवून घेणे. त्यात मैदा टाकून तो सुद्धा पसरवून घेणे आणि उरलेला मैदा झटकावून काढून घेणे. आता केक चे मिश्रण ओतणे व केक ५० मिनटे मंद gas वर होऊ देणे (केक झाला नसेल तर थोडा अजून होऊ देणे  व शिजल्यावर Gas बंद करणे.

Comments