बिस्किटांचा केक/biscuits cake



साहित्य-
१. chocolate बिस्कीट ची ३ पाकिटे
२. glucose बिस्कीट चे १ पाकीट
३. साखर २ चमचे
४. खायचा सोडा १ चमचा
५. दुध आवश्यकतेनुसार

कृती-
सर्व बिस्किटे व साखर एकत्र मिक्सर मधून बारीक करून घेणे. त्यात आवश्यकते नुसार दुध टाकणे व चांगले फेटून घेणे मग खायचा सोडा टाकणे.
केक च्या भांड्याला तूप चांगले पसरवून घेणे . आता त्यात केक चे मिश्रण टाकून मंद gas वर ४५ मिनिटे होऊ देणे. केक शिजल्यावर काढून घेणे.

टीप-
हा केक खायला अगोड लागतो. जास्त साखर टाकली तर केक चिकट होण्याची शक्यता असते. म्हणून केक झाल्यावर त्यावर साईचे क्रीम करून टाकावे म्हणजे केक चविष्ट व गोड लागतो. साईचे क्रीम करण्यासाठी १ वाटी साय व पाउण वाटी पिठी साखर मिक्सर मध्ये फेटून घेणे. (आवश्यकता वाटल्यास जास्त साखर टाकणे ). हे मिश्रण सरबरीत करून घेणे. आता केक चे स्लाईसेस करून एका एका स्लाईस वर हे क्रीम टाकून सर्व्ह करणे.

Comments