तिखट मिठाच्या पुऱ्या/ namkin puri


साहित्य-
१. कणिक २ वाट्या
२. बेसन १/२ वाटी
३. ओवा २ चमचे
४. जिरेपूड १ चमचा
५. मीठ चवीनुसार
६. तेल तळण्यासाठी
७. मिरच्या ५-६ 
८. लसूण पाकळ्या १०
९. कसुरी मेथी २ चमचे 

कृती-
सर्वप्रथम मिरच्या व लसूण बारीक वाटून घेणे. एका परातीत कणिक, बेसन, ओवा, जिरेपूड, वाटण, कसुरी मेथी, मीठ एकत्र करून घेणे. त्यात मोठा चमचा गरम तेलाचे मोहन टाकून निट एकत्र करणे व पाणी टाकून घट्ट भिजवून घेणे. आता एका कढईत तेल तापत ठेवणे. चांगले गरम झाल्यावर एक एक पुरी लाटून सोडणे, व खरपूस तळून घेणे.

टीप-
ह्या पुऱ्या नाश्त्याला सॉस बरोबर किंवा ओल्या नारळाच्या चटणी बरोबर गरम गरम खायला द्याव्यात.

Comments