कणकेची चकली / wheat flour chakli
साहित्य-
१. कणिक ४ वाट्या
२. तिखट ३ चमचे
३. मीठ चवीनुसार
४. ओवा अर्धा चमचा
५. तीळ ३ चमचे
६. तेल तळण्याकरिता
कृती-
एक पातळ फडके घ्यावे. त्यात
सर्व कणिक टाकून फडके घट्ट बांधून घ्यावे. एका घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवावे.
कुकरमध्ये पाणी घेऊन खाली जाळी ठेवावी. व त्यावर तो डबा ठेवावा. २ शिट्ट्या झाल्या
की gas बंद करून कुकर थंड होऊ द्यावा. मग आतील कणकेचा कडक गोळा झालेला असेल. त्याला
मोडून एकदा मिक्सर मध्ये मिश्रण फिरवून घ्यावे. जेणेकरून सर्व गुठळ्या मोडल्या
जातील. त्यात मीठ, तिखट, ओवा व तीळ टाकून थंड पाण्याने भिजवून झाकून ठेवावे. व
अर्ध्या-एक तासाने चकल्या पाडून गरम तेलात तळाव्या.
Comments
Post a Comment