नागपुरी पोहे / nagpur poha




साहित्य-
१. जाड पोहे २ वाट्या
२. कांदे ३
३. हिरवी मिरची ५
४. मोहरी पाव चमचा
५. जिरे पाव चमचा
६. मीठ चवीनुसार
७. टमाटे २
८. सुके खोबरे १ इंच
९. लसूण पाकळ्या ४
१०. आले एक छोटा तुकडा
११. कोथिंबीर एक वाटी
१२. तेल ५ चमचे
१३. तिखट दीड चमचा
१४. हळद पाव चमचा
१५. साखर पाव चमचा
१६. लिंबू पाव भाग

१७. कढीपत्त्याची पाने ७-८
  

कृती-
प्रथम पोहे चाळून, निवडून घ्यावे. मग पाण्याने धून बाजूला ठेवावे. आता १ कांदा व खोबरे बारीक चिरून घ्यावे. एका तव्यावर पाव चमचा तेल सोडून त्यावर प्रथम कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यावा. मग खोबरे भाजून घ्यावे. आता दोन्ही मिक्सरच्या भांड्यात टाकून त्यात आले, लसूण व थोडेसे पाणी टाकून बारीक वाटून घ्यावे. बाजूला ठेवावे. उरलेले २ कांदे उभे चिरावे. मिरची व कोथिंबीर धून चिरून घ्यावी. एका कढईत २ चमचे तेल तापवून घ्यावे. त्यात मोहरी, जिरे, कढीपत्ता तडतडू द्यावे. मग मिरची व कांदे टाकून शिजू द्यावे. कांदे शिजल्यावर हळद, साखर, मीठ टाकून पोहे टाकावे. आता पोहे झाकून १-२ वाफ काढावी. नंतर gas बंद करून वरून चिरलेल्या कोथिंबीरीतील अर्धी घेऊन पोह्यात टाकावी. व लिंबू पिळावे. आता एका पातेल्यात ३ चमचे तेल गरम करून वाटलेला मसाला टाकून त्यात तिखट, थोडीशी हळद, गरम मसाला टाकून १ मिनिट होऊ द्यावे. मग त्यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून टमाटे धून टाकून द्यावे. वरून झाकण ठेऊन ५-६ मिनिटे होऊ द्यावे. टमाटे थोडे शिजले असल्यास gas बंद करून वरून कोथिंबीर पेरावी. हे सार पोह्याबरोबर गरम गरम सर्व्ह करावे.



टीप-
नागपूर मध्ये सार पोह्यात वरून टाकून मग सर्व्ह करतात. सोबत गोल चकत्या केलेला कांदा, फरसाण व लिंबू सर्व्ह करू शकता.

Comments