चिकन बर्गर / chicken burger
साहित्य-
१. चिकन खिमा १ पाव
२. कांदे ३
३. टमाटा १
४. चीज स्लाईस ३
५. बर्गर पाव ३
६. चीज स्प्रेड ३ चमचे
७. बटर ३ चमचे
८. मिरपूड १ छोटा चमचा
९. मीठ चवीनुसार
१०. तेल ३-४ चमचे
११. तिखट अर्धा चमचा
१२. कॉर्न फ्लोअर २ चमचे
१३. लेट्युसची पाने ७-८
१४. tomato सॉस ३ चमचे
कृती-
प्रथम खिमा धून चाळणीत
निथळून घ्यावा. पूर्ण पाणी काढून घ्यावे. त्यात २ कांदे बारीक चिरून टाकावे.
मिरपूड, मीठ, तिखट, कॉर्न फ्लोअर घालून मिश्रण एकजीव करावे. एका नॉनस्टिक तव्यावर
तेल सोडावे व तवा गरम होऊ द्यावा. दोन्ही हाताला थोडेसे तेल लावून मिश्रणाचे ३
मोठ्या आकाराचे गोळे करून घ्यावे. आता बर्गर पाव ची साईझ बघून त्याप्रमाणे ते गोळे
हातावर घेऊन थापावे, व गोल आकार द्यावा. व अलगद तापलेल्या तव्यावर ठेवावे. एका
साईड ने चांगले ब्राऊन झाल्यावर पलटवून दुसरी साईड चांगली भाजून घ्यावी. असे तीनही
patties तयार करून बाजूला ठेवावे. बर्गर ब्रेडला मधून कापून दोन भाग करावे. एका
तव्यावर एक चमचा बटर सोडून त्या ब्रेड ची कापलेली आतील बाजू भाजून घ्यावी.
याप्रमाणे बाकीच्या दोन्ही ब्रेड भाजून घ्याव्या. उरलेल्या एका कांद्याच्या व एका
टमाट्याच्या गोल स्लाईसेस करून घ्याव्या. लेट्युसची पाने धून त्याचा मधील कडक
देठाचा भाग काढून एका पानाचे ३-४ तुकडे याप्रमाणे तोडून घ्यावे. आता बर्गर ब्रेडची
खालची बाजू घेऊन त्याला १ चमचा चीज स्प्रेड लावावे. त्यावर १ चमचा tomato सॉस
पसरवून घ्यावा. त्यावर एक बर्गर patty ठेववी. त्यावर कांद्याच्या ४-५ व
टमाट्याच्या २-३ स्लाईस ठेऊन त्यावर लेट्युस ची पाने ठेवून त्यावर १ चीज स्लाईस
ठेवावे. व वरून बर्गर ब्रेड ची वरील बाजू ठेऊन सर्व्ह करावे.
Comments
Post a Comment