कुरकुरी भेंडी / crispy okra




साहित्य-
१. भेंडी १ पाव
२. बेसन २ चमचे
३. तांदूळ पीठ २ चमचे
४. तिखट अर्धा चमचा
५. गरम मसाला १ चमचा
६. मीठ चवीनुसार
७. तेल तळण्यासाठी
८. चाट मसाला अर्धा चमचा 

कृती-
प्रथम भेंडी धून पूर्णपणे कोरडी करून घ्यावी. एका भेंडीचे ४ याप्रमाणे सर्व भेंडी उभी चिरून घ्यावी. त्यावर तिखट, गरम मसाला, मीठ टाकून हाताने थोडे ढवळून घ्यावे. आता तांदूळ पीठ व बेसन टाकून परत ढवळून घ्यावे. भेंडीला सर्व बाजूने मसाला चांगल्या प्रकारे लागायला हवा. आता अर्धा तास भेंडी झाकून ठेवावी. मग एका कढईत तेल तापवून त्यात एक एक भेंडी वेग वेगळी करून सोडावी. व सर्व भेंडी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यावी. टिशू पेपरवर काढून वरून चाट मसाला भुरभुरावा. गरम गरम नुसतीच किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी.

Comments