मक्याचे पराठे / sweet corn paratha
साहित्य-
१. स्वीट कॉर्न २
२. बटाटा १
३. लिंबू अर्धे
४. हळद पाव चमचा
५. आले एक छोटा तुकडा
६. मिरच्या ५-६
७. कोथिंबीर अर्धी वाटी
८. कणिक ४ वाट्या
९. तेल अर्धी वाटी
१०. मीठ चवीनुसार
११. कांदे २
१२. बटर ५ चमचे
कृती-
प्रथम कुकर लावण्यासाठी दोन्ही
कणसे मधून तोडून कुकरच्या भांड्यात टाकावी. सोबत बटाट्याचे २ तुकडे करून टाकावे. ३
शिट्या झाल्यावर gas बंद करावा. मग कणसाचे दाणे काढावे. बटाटा सोलून घ्यावा.
मिक्सरच्या भांड्यात कणसाचे दाणे, मिरच्या, आले टाकून बारीक वाटून घ्यावे. एका
कढईत २ चमचे तेल गरम करून बारीक चिरलेला कांदा तेलात शिजवून घ्यावा. आता त्यात हळद,
वाटलेले मिश्रण, कुस्करलेला बटाटा, मीठ टाकून थोडेसे परतावे. २ मिनिटाने gas बंद
करून चिरलेली कोथिंबीर व लिंबाचा रस टाकून मिश्रण थंड होऊ द्यावे. कणकेत मीठ टाकून
पाण्याने मऊसर भिजवून घ्यावी. १ चमचा तेल लावून थोडेसे मळावे. आता कणकेचा थोडा
मोठा गोळा घेऊन त्याची पारी करून त्यात सारण भरावे. व गोळा बंद करून पराठ्याला पीठ
लावून जाडसर लाटुन घ्यावे. आता एका तव्यावर दोन्ही बाजूने तेल सोडून खरपूस भाजून
गरम गरम बटर बरोबर सर्व्ह करावे.
Hi, your app is not available on google play anymore ?
ReplyDeleteHi Anamit,
ReplyDeleteWe are working on latest version of Kharmure app. Sorry for inconvenience.