गुलकंद-कंदी पेढा / kandi peda with gulkand




साहित्य-
१. खारा पिस्ता १५
२. ५ चमचे गुलकंद
३. ५०० ग्राम खवा
४. दीड वाटी साखरेची पूड
५. विलायची पावडर १ छोटा चमचा

कृती-
एका नॉनस्टिक भांड्यात खवा व साखर टाकून gas वर गरम करण्यास ठेवावे. मिश्रण घट्ट होईपर्यंत सतत ढवळत राहावे. मिश्रण घट्ट होत आले की विलायची पावडर टाकून मिक्स करावे व gas बंद करावा. मिश्रण थंड होऊ द्यावे. आता मिश्रणाचा लिंबाएवढा छोटा गोळा घेऊन त्यची हातावर पारी करावी. त्यात छोटा अर्धा चमचा गुलकंद, एक पिस्ता टाकून पारी बंद करून त्याचा गोल किंवा हवा तो आकार करून सर्व पेढे तयार करून घ्यावे. लगेच ते फ्रीज मध्ये थंड होण्यास ठेवावे. व थंडच सर्व्ह करावे. 

टीप-
मिश्रण gas वर असताना ते जास्त घट्ट होऊ देऊ नये. थंड झाल्यावर ते आणखीन घट्ट होते याचा अंदाज घेऊनच करावे.
वेगळा आकार द्यायचा असल्यास, मिश्रणाची प्लास्टिक वर पोळी लाटुन त्यात गुलकंद व पिस्ता भरून रोल करून मग ते चाकूने कापून त्यावर चांदीचा वर्ख लावल्यास ‘गुलकंद रोल’ होतो.       

Comments