व्हेज बिर्यानी / veg biryani


साहित्य-
१. बासमती तांदूळ १ पाव
२. कांदे ८
३. टमाटा १
४. फरसबी १०
५. गाजर १
६. लवंग ४
७. वेलची ४
८. गरम मसाला अर्धा चमचा
९. बिर्यानी मसाला २ चमचे
१०. तेल ५ चमचे
११. मीठ चवीनुसार
१२. आले-लसूण पेस्ट २ चमचे  
१३. काजू १०
१४. मोहरी पाव चमचा
१५. जिरे पाव चमचा
१६. दही ५ चमचे
१७. लाल, हिरवा, पिवळा रंग प्रत्येकी २ चिमुट
१८. फुलकोबी १ १/२ वाटी
१९. तिखट चवीनुसार
२०. चिरलेली कोथिंबीर १ वाटी
 
कृती-
तांदूळ धून अर्धा तास पाणी काढून ठेवून द्यावे. मग तांदुळाच्या पाऊण भाग पाणी घेऊन त्यात लवंग, वेलच्या, थोडेसे मीठ टाकून कुकर मध्ये तांदूळ शिजवून घ्यावे. आता शिजवलेल्या भाताचे ५ भाग करून त्यातील २ भाग मिक्स करून घ्यावे. व वेगळे ठेवून द्यावे. आता उरलेल्या ३ भागांमध्ये ३ रंग वेग वेगळ्या वाट्यांमध्ये घेऊन मिक्स करावे. कांदे उभे चिरून घ्यावे. त्यातील ४ कांदे तेलात चांगले खरपूस लाल तळून बाजूला ठेवावे. मग काजू मधून तोडून एका काजूचे २ भाग करून ते देखील त्याच तेलात लाल तळून घ्यावे. आता टमाटा, फरसबी, गाजर, फुलकोबीचे बारीक तुकडे करून घ्यावे. एका मोठ्या भांड्यात तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. मग त्यात उरलेला कांदा टाकून चांगला शिजू द्यावा. सर्व भाज्या टाकून ५ मिनिटे शिजवून घ्यावे. मग त्यात आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट, मीठ, बिर्यानी मसाला टाकावा. दही फेटून टाकावे. gas बंद करावा. आता या मसाल्यातील ३/४ मसाला काढून घ्यावा. उरलेला मसाला त्याच भांड्यात ठेऊन त्यावर पांढरा भात पसरवून टाकावा. आता थोडासा मसाला पसरवून त्यावर हिरवा भात पसरवावा. मग परत थोडा मसाला पसरवून लाल भात पसरवावा. उरलेला मसाला पसरवून पिवळा भात पसरवून घ्यावा. भांड्याला जाड पेपर च्या गठ्ठ्याने झाकण लावून दोरीने बांधून घ्यावे. जेणेकरून पेपर मधून हवा जाणार नाही. १ तासाने काढून घ्यावे. खायला देताना बिर्यानी थोडीशी ढवळून त्यावर कोथिंबीर, तळलेले काजू व तळलेल्या कांद्याने सजवावे. व दह्याच्या रायत्याबरोबर खायला द्यावे.

Comments