खजूर चॉकलेट / khajur chocolate


साहित्य-
१. बिया काढलेले खजूर १ वाटी
२. मारी बिस्किटे ५
३. साय पाव वाटी
४. काजू ५
५. बदाम ५

कृती-
बिस्किटे मिक्सर मधून बारीक करून पावडर करून घ्यावी. खजूर मिक्सर मध्ये फिरवून घ्यावे. काजू व बदाम थोडे भाजून त्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. आता खजूर व साय एका भांड्यात घेऊन gas वर गरम करण्यास ठेवावी. मिश्रण घट्ट होत आले की बिस्किटांचा चुरा टाकावा. gas बंद करून त्या मिश्रणाचे हवे त्या आकारात चॉकलेट बनवावे.
 
टीप-
लहान मुले जर खजूर खात नसतील तर त्यांना अश्याप्रकारे चॉकलेट बनवून रंगीबेरंगी कागदांमध्ये गुंडाळून दिल्यास ते आवडीने खातील.

Comments