मेथी दाणे / methi dana


साहित्य-
१. मेथी अर्धा किलो
२. दाणे १ वाटी
३. लसूण पाकळ्या ७-८
४. आले एक छोटा तुकडा
५. जिरे पाव चमचा
६. मोहरी पाव चमचा
७. कांदे २
८. टमाटा १
९. तेल ५ चमचे
१०. तिखट चवीनुसार
११. मीठ चवीनुसार

कृती-
मेथी धून चिरून घ्यावी. कांदा, टमाटा चिरून घ्यावा. आले-लसूण ची पेस्ट करावी. दाणे अगदी थोडेसे कुटून घ्यावे. त्याचा कुट करू नये. एका भांड्यात तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. मग त्यात कांदा परतवून घ्यावा. त्यात आले लसूण ची पेस्ट टाकावी. मग टमाटा टाकून लगेच त्यात हळद, तिखट व मेथी टाकावी. झाकण ठेऊन थोडेसे शिजवून घ्यावे. २ वाफ काढावी. मग दाणे व मीठ टाकून ढवळून gas बंद करावा. ही भाजी भाकरी बरोबर छान लागते.

Comments