चटका / chatka
साहित्य-
१. बटाटे २
२. आंबट दही १ वाटी
३. तेल ४ चमचे
४. कढीपत्ता ५ पाने
५. मीठ चवीनुसार
६. मिरच्या ५
७. मोहरी अर्धा चमचा
८. जिरे अर्धा चमचा
९. हळद पाव चमचा
१०. हिंग पाव चमचा
११. कोथिंबीर पाव वाटी
कृती-
बटाटे उकडून अर्धवट कुस्करून घ्यावे. त्यात दही, मीठ, कोथिंबीर चिरून टाकावी. एका कढल्यात तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. मग मिरच्या टाकाव्या. कढीपत्ता हाताने तोडून टाकावा. आता हिंग, हळद टाकून gas बंद करून ही फोडणी बटाट्यात टाकावी. आता सर्व मिक्स करून घ्यावे. हा चटका पोळीबरोबर किंवा भाकरीबरोबर खावा.
Comments
Post a Comment