तिखट पुरण पोळी / namkeen puran paratha
साहित्य-
१. हरबरा डाळ १ वाटी
२. कांदे २
३. तिखट चवीनुसार
४. गरम मसाला १ चमचा
५. मीठ चवीनुसार
६. कोथिंबीर १ वाटी
७. आले एक छोटा तुकडा
८. लसूण पाकळ्या ५-६
९. कणिक १ १/२ वाट्या
१०. तेल आवश्यकतेनुसार
११. पाणी आवश्यकतेनुसार
१२. जिरे पूड १ चमचा
१३. धने पूड १ चमचा
१४. मैदा अर्धी वाटी
कृती-
कणिक व मैदा बारीक चाळणीने चाळून घ्यावा. त्यात मीठ टाकून पाण्याने घट्ट गोळा भिजवून घ्यावा. डाळीत ४ वाट्या पाणी टाकून कुकर मध्ये शिजवून घ्यावी. मग त्यातील जास्तीचे पाणी काढून डाळ वाटून घ्यावी. त्यात बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, आले-लसूण ची पेस्ट, जिरे पूड, धने पूड, मीठ, गरम मसाला व तिखट टाकून एकत्र करावे. हे पुरणाचे मिश्रण, पोळी लाटून त्यात भरावे. व पोळी बंद करून लाटून घ्यावी. तव्यावर १ चमचा तेल सोडून दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घ्यावी. ही पुरण पोळी दह्याबरोबर खावी.
Comments
Post a Comment