सोळा पदरी पराठा / sixteen layers paratha
साहित्य-
१. कणिक २ वाट्या
२. ओवा २ चमचे
३. हळद अर्धा चमचा
४. मीठ चवीनुसार
५. तेल आवश्यकतेनुसार
६. पाणी आवश्यकतेनुसार
७. कसुरी मेथी पाव वाटी
कृती-
कणिक, ओवा, हळद, मीठ, कसुरी मेथी एकत्र करून पाण्याने भिजवून घ्यावे. (मीठ थोडे जास्त टाकावे. जेणेकरून नुसता पराठा खायला चविष्ट लागेल). घट्ट गोळा झाल्यावर पोळीच्या गोळ्याच्या दुप्पट आकाराचा गोळा घेऊन तो गोल लाटावा. त्या पोळीला हाताने सगळीकडे वरून तेल लावावे, व कणिक भुरभुरावी. आता सुरीने त्याला उभे ३ व आडवे ३ असे कट मारावे. म्हणजे त्याचे १६ चौकोनी तुकडे होतील. आता सगळे तुकडे एकावर एक ठेवावे. न दाबता अलगद दोन्ही बाजूनी कणिक लावून परत पोळी लाटावी. आता गोल आकाराची ताटली पोळीवर ठेऊन दाबावी. व गोल आकार कापून घ्यावा. तव्यावर अर्धा चमचा तेल सोडून दोन्ही बाजूनी हा पराठा भाजून घ्यावा. हा पराठा नुसता चटणीबरोबरही छान लागतो.
Comments
Post a Comment