गुलाबजाम / gulabjamun


साहित्य-
१. खवा अर्धा किलो
२. मैदा अर्धा पाव
३. रोज इसेन्स पाव चमचा
४. साखर अर्धा किलो
५. पाणी आवश्यकतेनुसार
६. तेल तळण्यासाठी

कृती-
मैदा थोडासा भाजून तो खव्यात टाकून चांगला मळून घ्यावा. त्याचे छोटे छोटे गोळे करावे. एका कढईत तेल चांगले तापवून मग gas मंद करून गुलाबजाम चांगले लाल तळून घ्यावे. तळताना हलक्या हाताने सारखे हलवत राहावे. पाक करण्यासाठी साखर भिजेल इतके पाणी व वर थोडे पाणी साखरेत घेऊन gas वर होऊ द्यावे. पाकाला उकळी आली कि २-३ मिनिटांनी त्यात रोज इसेन्स व गुलाबजाम टाकून अजून एकदा उकळी येऊ द्यावी. मग gas बंद करावा. २-३ तास गुलाबजाम मुरु द्यावे. मग खायला घ्यावे. जेवढे मुरतील तेवढेच चविष्ट लागतात.

टीप-
गुलाबजाम करताना मैद्याच्या ऐवजी रवा वापरला तरी चालतो. रवा वापरताना तो आधी २ तास दुधात भिजवून ठेवावा.

Comments