इन्स्टंट गुलकंद लाडू ( instant gulkand ladoo)

साहित्य-

१. गुलकंद 4-5 चमचे 

२. डेसिकेटेड कोकोनट 3 वाटी

३. रोझ सिरप पाव वाटी

४. कंडेन्स मिल्क 100 ग्रॅम

कृती-

प्रथम कंडेन्स मिल्क आणि डेसिकेटेड कोकोनट एका नॉनस्टिक पॅन मध्ये गरम करायला ठेवावे. गॅस मंद आचेवर ठेऊन सतत ढवळत राहावे. त्यात 2 मिनीटांनी रोज सिरप टाकावे ( रोज सिरप मध्ये जर कलर ऍडेड नसेल तर थोडासा पिंक कलर येण्याकरिता रेड कलर टाकावा) आता 4-5 मिनिटे सतत ढवळत राहावे.(आवडत असल्यास काजूचे तुकडे टाकावे) थोडं मिश्रण घट्ट होत आलं की गॅस बंद करून गुलकंद टाकावे..(मिश्रण जास्त घट्ट होऊ देऊ नये) आणि आता मिश्रण एकत्र करून छोटे छोटे गोळे बनवावे.. आणि ते डेसिकेटेड कोकोनट मधे घोळवून घ्यावे..

Comments