हेल्दी व्हेज गव्हाच्या पिठाचे डोरा केक (Healthy Veg Whole Wheat Dora Cake)

साहित्य - 

१. गव्हाचे पीठ २ वाटी 

२. सोडा अर्धा चमचा 

३. बेकिंग पावडर अर्धा चमचा

४. पिठीसाखर अर्धी वाटी

५. व्हॅनिला इसेन्स पाव चमचा

६. दूध आवश्यकतेनुसार 

७. न्यूटेला चॉकलेट स्प्रेड आवडीनुसार 

८. चॉकलेट सॉस सजावटीसाठी

९. बटर ३-४ चमचे 


कृती - 

प्रथम एका भांड्यात गव्हाचे पीठ, सोडा, बेकिंग पावडर, पिठीसाखर, व्हॅनिला इसेन्स एकत्र करून घेणे. त्यात आवश्यकतेनुसार दूध टाकून मिश्रण पातळसर बनवणे. आता एका नॉनस्टिक पॅनवर पाव चमचा बटर टाकून अर्धी वाटी मिश्रण ओतणे. मंद आचेवर 3-4 मिनिटे शिजू देणे. खालच्या बाजूला छान ब्राऊन रंग आल्यावर पालथे शेकून घेणे. अश्या प्रकारे सगळे पॅन केक्स करून घेणे. आता दोन केक्सच्या मध्ये न्यूटेला स्प्रेड लावणे. सर्व्ह करताना चॉकलेट सिरप टाकून सर्व्ह करणे.

Comments