हेल्दी गव्हाच्या पिठाचा पिझ्झा व पिझ्झा बन्स (healthy whole wheat pizza and pizza buns)


साहित्य - 

१. झुकीनी अर्धी वाटी चिरलेले काप

२. बेझील लिव्हज ७-८ पाने 

३. मशरूम ३ 

४. कांदा १ 

५. शिमला मिरची १ 

६. चेरी टोमॅटो ७-८

७. पिझ्झा सिझनिंग २ चमचे

८. ऑलिव्ह ऑईल आवश्यकतेनुसार 

९. मीठ चवीनुसार

१०. चिली फ्लेक्स १ चमचा 

११. गव्हाचे पीठ ३ वाटी 

१२. ड्राय ऍक्टिव्ह यीस्ट २ चमचे 

१३. पिझ्झा सॉस अर्धी वाटी 

१४. मॉझ्झरेला चीज आवडीनुसार

१५. एक अंड (ऑप्शनल) 


कृती - 

सगळ्यात आधी झुकीनी, बेझील लिव्हज, मशरूम, कांदा, शिमला मिरची, चेरी टोमॅटो सर्व जाडसर चिरून घेणे त्यात पिझ्झा सिझनिंग, 3 चमचे ऑलिव्ह ऑइल, मीठ, चिली फ्लेक्स टाकून थोडा वेळ ठेऊन देणे. एका भांड्यात गव्हाचे पीठ, मीठ, यीस्ट, 3 चमचे ऑलिव्ह ऑइल व आवश्यकतेनुसार पाणी टाकून गोळा चांगला मळुन घेऊन सैलसर भिजवणे. 1 तास ओल्या कापडाखाली झाकून ठेवणे. नंतर  परत मळून घेणे. एका अल्युमिनियम पॅन ला ऑलिव्ह ऑईल लावून ठेवणे. त्यावर पिझ्झासाठी मोठ्ठा गोळा घेऊन हाताने जाडसर पूर्ण पॅनभर पसरवून घेणे. आता त्यावर पिझ्झा सॉस लावणे. व मॅरीनेट केलेल्या भाज्या पसरवून चीज टाकणे. प्रिहिटेड ओव्हन मध्ये 20 मिनिटे बेक करणे. त्याच प्रमाणे पिझ्झा बेस चा मोठा गोळा हातावर घेऊन त्याला खोलगट बनवून त्याला पिझ्झा सॉस लावून भाज्या व चीज टाकून गोळा बंद करणे. पॅनला ऑईलने ग्रीस करून त्यात गोळा ठेऊन त्याला वरून फेटलेल्या अंड्याने ब्रशच्या साहाय्याने थोडंसं ग्रीस करणे. म्हणजे पिझ्झा बन ला वरतून छान कलर येतो. व पिझ्झा प्रमाणेच बेक करणे. शिजल्यावर बन्स कापून गरम गरम सर्व्ह करणे.

Comments