चॉकलेट डोनट्स (chocolate donuts)

साहित्य - 

१. गव्हाचे पीठ / मैदा 3 वाटी

२. मीठ अर्धा चमचा 

३. ड्राय ऍक्टिव्ह यीस्ट २ चमचे

४. पिठीसाखर 3 चमचे 

५. पाऊण कप दुध

६. व्हॅनिला इसेन्स अर्धा चमचा

७. बटर पाव वाटी 

८. तेल तळण्यासाठी

९. डार्क ब्राऊन आणि व्हाईट कूकिंग चॉकलेट आवश्यकतेनुसार

१०. शुगर बॉल्स सजावटीकरता 


कृती - 

गव्हाचे पीठ, मीठ, यीस्ट, पिठी साखर एकत्र करणे. दूध, व्हॅनिला इसेन्स व बटर एकत्र थोडं गरम करून पिठाच्या मिश्रणात टाकणे. एकत्र करून आवश्यकतेनुसार पाणी टाकून गोळा भिजवणे (जास्त घट्ट भिजवू नये, मऊसर भिजवावा) 5 मिनिटे चांगला मळून घेणे. एका पातेल्यात घेऊन 2 तासाकरता  ओल्या कापडाखाली झाकून वरतून ताट ठेवणे. मग परत मळून घेऊन त्याची जाड पोळी लाटून डोनट च्या आकारांमध्ये वाटी च्या साहाय्याने कापून घेणे. डोनटच्या मध्यभागी बाटलीच्या झाकणाच्या सहाय्याने गोल छिद्र कापून घेणे. एका ताटात थोड पीठ भुरभुरवून सगळे डोनट त्यावर ठेवून परत ओल्या कापडाने झाकणे. मग एक तासाने मिडीयम आचेवर गरम तेलात तळून घेणे. आता थंड झाल्यावर डार्क आणि व्हाईट चॉकलेट डबल बॉयलर वर वेगवेगळे गरम करून त्यात डोनट एका बाजूने बुडवून त्यावर शुगर बॉल्स ने हवे तसे सजवणे. आणि सर्व्ह करणे.


Comments