मटण चॉप्स /mutton chops



साहित्य-
१. मटण चॉप्स ६
२. अंड १
३. लसूण पाकळ्या ८-९
४. आले एक छोटा तुकडा
५. मीठ चवीनुसार
६. हळद पाव चमचा
७. तिखट आवश्यकतेनुसार
८. ब्रेडक्रम्स एक वाटी
९. लिंबू अर्ध
१०. कॉर्नफ्लोअर ४-५ चमचे  
११. गरम मसाला १ चमचा
१२. तेल तळण्यासाठी
१३. पुदिन्याची पाने ८-९
कृती-
प्रथम लसूण, आले, पुदिन्याची मिक्सर मध्ये वाटून घ्यावी. चॉप्सना लिंबू, हळद, मीठ लावून एक तास ठेवून द्यावे. नंतर कॉर्नफ्लोअर, गरम मसाला, तिखट, अंड, व वरील वाटण लावून परत १ तास ठेवावे. मग तेल तापू द्यावे. मटण चॉप्स ब्रेडक्रम्स मध्ये घोळवून कडकडीत तेलात तळून गरम खायला द्यावे. 

Comments