कुरकुरे स्ट्रिप्स / crunchy strips



साहित्य-
१. मैदा २ वाट्या
२. तेल आवश्यकतेनुसार
३. जिरे २ चमचे
४. ओवा १ चमचा
५. तिखट आवश्यकतेनुसार
६. मीठ चवीनुसार
७. चाट मसाला अर्धा चमचा
८. कसुरी मेथी २ चमचे
कृती-
मैद्यात ओवा, जिरे, मीठ, व कसुरी मेथी टाकून मिक्स करावे. आता त्यात अर्धी वाटी (किंवा त्यापेक्षा थोडे कमी) गरम तेलाचे मोहन टाकून एकत्र करावे व पाण्याने घट्ट गोळा करून घ्यावा. पोळपाटावर पोळीप्रमाणे पातळ लाटून त्याच्या लंब्या लंब्या स्ट्रिप्स कापाव्या व कडकडीत तेलात खरपूस तळाव्या. (लांब नको असल्यास त्या मधून कापून लहान कराव्या). नंतर त्यावर तिखट व चाट मसाला भुरभुरावा व हलक्या हाताने ढवळावे. 

टीप-
ह्या स्ट्रिप्स हवाबंद डब्ब्यात ठेवल्यास बरेच दिवस तश्याच राहतात. 

Comments