मक्याचे सूप / sweet corn soup



साहित्य-
१. sweet corn २
२. साखर २ चमचे
३. मिरपूड १ चमचा
४. बटर ४ चमचे
५. मीठ चवीनुसार
६. पाणी आवश्यकतेनुसार
कृती-
प्रथम मक्याच्या कणसाचे २-३ तुकडे करून कुकर मध्ये वाफवून घ्यावे. त्याचे दाणे काढावे. त्यातील अर्धी वाटी दाणे वेगळे काढून उरलेले दाणे मिक्सर मध्ये बारीक फिरवून घ्यावे व त्यात हवे असेल तेवढे पातळ करण्यासाठी पाणी टाकून मिक्स करून घ्यावे. एका पातेल्यात हे मिश्रण टाकून त्यात मीठ, बटर, मिरपूड, साखर व वगळलेले दाणे टाकून सूप उकळवून घेणे. गरम गरम सर्व्ह करणे. 

Comments