सुरळीची वडी / suralichi vadi



साहित्य-
१. बेसन १ वाटी
२. आंबट ताक १ वाटी
३. पाणी दीड वाटी
४. मीठ चवीनुसार
५. हळद पाव चमचा
६. तेल आवश्यकतेनुसार
७. मिरच्या ४-५
८. ओले खोबरे १ वाटी
९. कोथिंबीर अर्धी वाटी
१०. मोहरी अर्धा चमचा
११. जिरे पाव चमचा
कृती-
कोथिंबीर, व मिरची बारीक चिरून घ्यावी. खोबरे खवून घ्यावे. २-३ ताटांना पालथे करून तेल सगळीकडे लावून घेणे. एक वाटी बेसन व एक वाटी ताक मिक्सर मधून फिरवून घेणे. पाणी बारीक gas वर उकळायला ठेवणे. त्यात मीठ, हळद, व २ चमचे तेल टाकणे. मग त्यात वरील मिश्रण टाकून चांगले घोटणे. ३-४ मिनिटांनी सुटायला लागल्यावर खाली उतरवून घेणे. आता ह्या मिश्रणाचे तीन भाग करुन तीन ताटांवर ठेवणे. व लगेच उलटन्याने ते सगळीकडे पातळ पसरवून घेणे. एका कढल्यात ४-५ चमचे तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे व मिरचीची फोडणी करून घ्यावी. कोथिंबीर, फोडणी व खोबरे एकसमान ताटावरील मिश्रणावर पसरवून घ्यावे. ह्याच्या चाकूने लांब लांब पट्या कापून एक एक पट्टीची गुंडाळी करून सर्व्ह करावे.
टीप-
मिश्रण gas वरून खाली उतरवल्यावर ते थंड व्हायच्या आत ताटांवर पसरवून घ्यावे. नाहीतर ते थंड होऊन घट्ट होते. 

Comments