व्हेज मंचुरियन / veg manchurian



साहित्य-
१. पानकोबी २ वाट्या
२. गाजर १ वाटी
३. फरसबी अर्धी वाटी
४. लसूण ७-८ पाकळ्या
५. शिमला मिरची अर्धी वाटी
६. सोया सॉस ३ चमचे
७. tomato सॉस २ चमचे
८. अजिनोमोटो अर्धा चमचा
९. मीठ चवीनुसार
१०. तिखट चवीनुसार
११. मिरच्या २-३
१२. तेल आवश्यकतेनुसार
१३. मैदा आवश्यकतेनुसार
१४. कॉर्नफ्लोअर १ चमचा
१५. पातीचा कांदा अर्धी वाटी
१६. कांदा १
१७. आले एक छोटा तुकडा
१८. पाणी आवश्यकतेनुसार
कृती-
पानकोबी, गाजर, फरसबी पातळ लांब चिरून एकत्र करावे. त्यात १ चमचा सोय सॉस, चिमुटभर अजिनोमोटो, मीठ टाकून चांगले मिक्स करून घ्यावे. त्यात मैदा व पाणी टाकून त्याचे छोटे छोटे गोळे करावे. कडक तापलेल्या तेलात तळून घ्यावे. व बाजूला ठेवून द्यावे. आता एका भांड्यात उरलेला सोया सॉस, अजिनोमोटो, tomato सॉस, तिखट, मीठ, कॉर्नफ्लोअर व ३ कप पाणी एकत्र करून घ्यावे. एका कढईत ३ चमचे तेल तापवून त्यात बारीक चिरलेला लसूण, मिरच्या, आले व कांदा चांगला परतवून घ्यावा. आता त्यात बारीक चिरलेली शिमला मिरची व पातीचा कांदा टाकून ढवळून घ्या व लगेच वरील पाण्याचे मिश्रण टाकून उकळी येऊ द्या. सर्व्ह करण्याच्या आधी २ मिनिटे तयार गरम सॉस मध्ये मंचुरियनचे गोळे टाकून खायला द्यावे. 

Comments