रवा इडली / rava idli


साहित्य-
१. उडीद डाळ अर्धी वाटी
२. बारीक रवा सव्वा वाटी
३. मीठ चवीनुसार
४. तेल एक चमचा

कृती-
उडीद डाळ सकाळी पाण्यात भिजत घालणे. रात्री बारीक वाटून घेणे. रवा थोडासा भाजून त्यात टाकणे. मीठ व तेल टाकून मिक्स करणे. आता पाणी टाकून इडली च्या मिश्रणाइतपत पातळ करून झाकून ठेवणे. मिश्रण सकाळी फुगून डबल झाले की अलगद  इडली पत्राला तेल लावून त्यात लावणे. १५ मिनिटे होऊ देणे. व गरम गरम सांबार व हरबऱ्याच्या किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर वाढणे.

टीप-
पीठ इडली पात्रात लावताना ते ढवळू नये. ते तसेच अलगद डावाने उचलून लावावे. असे केल्यास इडल्या हलक्या होतात.

Comments