रसगुल्ला / rasagulla


साहित्य-
१. दुध १ १/२ लिटर
२. साखर २ वाट्या
३. कॉर्न फ्लोर १ चमचा
४. पाणी ६ वाट्या
५. लिंबाचा रस १ चमचा

कृती-
दुध नासवण्यासाठी प्रथम दुध उकळताना लिंबाच्या रसात २ चमचे पाणी मिक्स करून टाकणे. पनीर व पाणी वेगळे दिसू लागल्यास gas बंद करून एका पातळ फडक्यात पनीर गाळून घट्ट बांधून थंड पाण्यात १० मिनिटे ठेवणे. मग पाण्यातून काढून परत एकदा दाबून त्या फडक्यातील पाणी काढून डीश मध्ये फडक्यावर थोडेसे वजन ठेऊन १० मिनिटे पनीर सेट होऊ देणे. आता फडक्यातून पनीर काढून घेणे. त्यात कॉर्न फ्लोर टाकून चांगले मिक्स करून त्याचे साधारण आकाराचे गोल गोळे बनवणे. एका भांड्यात साखर व पाणी घेऊन gas वर उकळायला ठेवणे. उकळी आल्यावर पनीरचे गोळे त्यात सोडणे.  २० मिनिटे चांगले उकळू देणे. रसगुल्ले फुगून डबल होतील. gas बंद करून थंड होऊ देणे. आता फ्रीज मध्ये ठेवावे. व थंड गार सर्व्ह करावे.

टीप-
१. पनीरचे गोळे करताना अलगद हाताने करावे. नाहीतर त्याचा चुरा होईल.
२. आपण आपल्या आवडीनुसार रासागुल्ल्याला आकार देऊ शकतो. लांबट आकार देऊन त्याची "चमचमी" देखील करता येते.

Comments