कोबीचा पराठा / gobika paratha


साहित्य-
१. फुल कोबी अर्धा किलो
२. आले एक छोटा तुकडा
३. लसूण ६-७ पाकळ्या
४. मोहरी पाव चमचा
५. जिरे पाव चमचा
६. हळद पाव चमचा
७. कणिक 2 वाट्या
८. कांदे २
९. तेल आवश्यकतेनुसार 
१०. मीठ चवीपुरते
११. मिरच्या ५-६
१२. मैदा २ वाट्या

कृती-
कोबी धून किसून घ्यावी. एका कढईत २ चमचे तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. कांदा टाकून परतवून घ्यावा. आले, लसूण, मिरच्यांची पेस्ट करून त्यात टाकावी. आता हळद व कोबी टाकून झाकण ठेऊन १ वाफ काढून घ्यावी. आता मीठ टाकून ते कोरडे करून घ्यावे. ढवळून थंड करण्यास ठेवावे.
मैदा, कणिक व मीठ एकत्र करून पाणी टाकून मळून घ्यावे. त्याचे साधारण पोळी पेक्षा दुप्पट आकाराचा असा एक याप्रमाणे गोळे करून प्रत्येक गोळ्यात ते सारण पुरणाप्रमाणे भरून त्याचे पराठे लाटून ते तेल टाकून दोन्ही बाजूने तव्यावर चांगले शेकून घ्यावे. व लोण्याबरोबर सर्व्ह करावे.

Comments