पनीर कट्टी रोल / paneer kati roll


साहित्य-
१. पनीर १/२ पाव
२. शिमला मिरची १
३. tomato १
४. कांदे २
५. tomato सॉस ४ चमचे
६. पत्ता कोबी १ वाटी
७. दही २ चमचे
८. बेसन १ चमचा
९. कसुरी मेथी १ चमचा
१०. गरम मसाला १ चमचा
११. तिखट चवीनुसार
१२. मीठ चवीनुसार
१३. कणिक २ वाट्या
१४. आले, लसूण पेस्ट २ चमचे
१५. तेल ३ चमचे
१६. बटर आवश्यकतेनुसार
१७. हळद अर्धा चमचा
१८. मोहरी अर्धा चमचा
१९. जिरे अर्धा चमचा
२०. चीज चे ३-४ क्युब्स
 
कृती-
दही, गरम मसाला, तिखट, हळद, मीठ, आले, लसूण पेस्ट, बेसन, कसुरी मेथी एकत्र करून घ्यावे. त्यात पनीर चे छोटे छोटे तुकडे करून टाकावे. चांगले हाताने मिश्रण पनीर ला लावून मुरण्यासाठी १ तास ठेवून द्यावे. एका कढईत तेल घेऊन त्यात मोहरी व जिरे तडतडू द्यावे. मग लांब चिरलेला कांदा होऊ द्यावा. कांदा झाल्यावर tomato , शिमला मिरची, पत्ता कोबी लंबी चिरून टाकावी. मग सॉस व पनीर चे मिश्रण टाकावे. व कोरडे होईपर्यंत ढवळत राहावे. थंड होऊ द्यावे. कणकेत मीठ टाकून भिजवून घ्यावी. त्याच्या पोळ्या लाटून ठेवाव्या. वेळेवर त्या पोळ्या बटर टाकून दोन्ही बाजूने भाजून घ्याव्या. मग त्यावर हे मिश्रण ठेवून चीज किसून टाकावे. पोळी रोल करावी. व अर्धी कट करून सर्व्ह करावी.

Comments