कुर्डयांचा उपमा/ kurdai upama


साहित्य-
१. कुर्डयांचा चुरा २ वाट्या
२. कांदे २
३. मोहरी पाव चमचा
४. जिरे पाव चमचा
५. मिरच्या ४
६. हळद पाव चमचा
७. तेल २-३ चमचे
८. पाणी ५ कप
९. मीठ चवीनुसार

कृती-
पाणी गरम करण्यास ठेवावे. उकळी आल्यावर त्यात कुर्डयांचा चुरा टाकून १ मिनिट होऊ द्यावे. नंतर चाळणीत काढून पाणी निथळून घ्यावे. एका कढईत तेल घेऊन त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. मग मिरच्या, कांदा परतवून घ्यावा. हळद टाकून कुर्डयांचा चुरा टाकावा. मीठ टाकून चांगले ढवळून gas बंद करून घ्यावा. गरम गरम उपमा सर्व्ह करावा.

Comments