टोमॅटोचं सार ( tomato saar )

साहित्य - 

१. टोमॅटो 5

२. तेल ३ चमचे 

३. मोहरी पाव चमचा 

४. जिरे पाव चमचा

५. हळद पाव चमचा

६. तिखट आवडीनुसार

७. कोल्हापुरी मसाला २ चमचे ( नसल्यास गरम मसाला अर्धा चमचा घेणे) 

८. कढीपत्त्याची पाने ५-६ 

९. मीठ चवीनुसार

१०. आले लसूण पेस्ट १ चमचा 

११. कोथिंबीर पाव वाटी 


कृती - 

प्रथम प्रत्येक टोमॅटोच्या एका बाजूस चाकूने चीर पाडून घ्यावी. (त्यामुळे उकळल्यावर त्याची साले काढणे सोपे जाते.) एका पातेल्यात टोमॅटो घेऊन त्यात टोमॅटो बुडतील एवढे पाणी घेऊन गरम करण्यास ठेवावे. उकळी आल्यावर एक मिनिटाने गॅस बंद करावा. आता त्यातील पाणी फेकून द्यावे. टोमॅटो थंड झाले की त्यांची साले काढून टाकावी. टोमॅटो थोडे दाबून त्यातील रस काढून घ्यावा. उरलेला टोमॅटोचा भाग मिक्सरमध्ये बारीक फिरवून घ्यावा. एका भांड्यात तेल गरम करून मोहरी, जिरे तडतडू द्यावे. त्यात कढीपत्त्याची पाने, आले लसूण पेस्ट, हळद टाकून थोडे परतावे. आता कोल्हापुरी मसाला व तिखट टाकून मिक्सरमधील गर व टोमॅटोचा काढलेला रस टाकून उकळी येऊ द्यावी. आता मीठ टाकावे. (सार गोडसर आवडत असल्यास पाव चमचा साखर टाकावी) गॅस बंद करून कोथिंबीर टाकून खिचडीबरोबर गरमागरम सार सर्व्ह करावे. 

Comments