अप्पे (appe)

साहित्य- 

१. तांदूळ २ वाटी

२. उडीद डाळ १ वाटी 

३. मेथी दाणे १ चमचा

४. पोहे अर्धी वाटी 

५. साबुदाणा २ चमचे 

६. मिरच्या ५-६ 

७. आले एक छोटा तुकडा 

८. मीठ चवीनुसार 

९. तेल आवश्यकतेनुसार

१०. कांदा १ 

११. टोमॅटो १

१२. कोथिंबीर अर्धी वाटी 

१३. इनो सोडा पाव चमचा 


कृती - 

सकाळी तांदूळ, डाळ, साबुदाणा, पोहे, मेथीदाणे धुवून पाण्यात भिजत घालावे. ७-८ तास चांगले भिजल्यावर रात्री मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. वाटत असताना अगदी थोडे पाणी घालावे व झाकून ठेवावे. सकाळी मिरची व आले मिक्सर मध्ये वाटून पेस्ट करावी. ही पेस्ट तांदळाच्या वाटणात टाकावी. त्याचबरोबर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून टाकावी. मीठ व सोडा टाकून मिश्रण चांगले एकत्र करावे. आता नॉनस्टिक अप्पेपात्र गरम करून एक एक थेंब तेल सोडून त्यात हे मिश्रण टाकावे. झाकण ठेवून मंद आचेवर खरपूस भाजून अप्पे पलटावे. अश्या प्रकारे दोन्ही बाजूने खरपूस भाजून खोबऱ्याच्या चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करावे. 

Comments