तंदुरी चिकन / tandoori chicken




साहित्य –

१. चिकन चे मोठे लेग पीस ४
२. दही १ वाटी
३. तिखट २ चमचे
४. गरम मसाला २ चमचे
५. आले लसूण पेस्ट २ चमचे
६. लाल कलर पाव छोटा चमचा
७. लिंबाचा रस ३ चमचे
८. कसुरी मेथी १ चमचा
९. मीठ चवीनुसार
१०. हळद अर्धा चमचा
११. धणेपूड १ चमचा
१२. जिरेपूड १ चमचा
१३ तूप २ चमचे 

कृती –

चिकन स्वच्छ धुवून घ्यावे. त्यातील सर्व पाणी निथळून काढून टाकावे. सर्व पिसेसना मोठ्या चिरा मारून घ्याव्या. चिरा पूर्ण बोन्स पर्यंत पोचू द्याव्या. आता वरील सर्व साहित्य एकत्र कालवून घ्यावे. व चिकनला चोळून व्यवस्थित लावून झाकण ठेऊन फ्रीज मध्ये ६ ते १२ तासांपर्यंत मुरण्यास ठेवून द्यावे. मायक्रोवेव्ह १८० वर प्रीहीट करावे. मग चिकनचे पिसेस ऱ्याक वर ठेवून १८० ग्रील वर अथवा कॉम्बिनेशन वर १० मिनिटे बेक करावे. १० मिनिटांनी चिकन पलटवून परत १० मिनिटे बेक करावे. तंदुरी चिकन सलाड व पुदिन्याच्या चटणीबरोबर खायला द्यावे.

Comments