कॉर्न पकोडा / corn pakora




साहित्य –

१. स्वीट कॉर्न कणीस १ मोठे
२. मिरच्या ४
३. मीठ चवीनुसार
४. कोथिंबीर अर्धी वाटी
५. जिरे अर्धा चमचा
६. आले एक छोटा तुकडा
७. कॉर्न फ्लोअर २ चमचे
८. तांदूळ पीठ २ चमचे
९. कांदा १
१०. तेल तळण्याकरिता
११. सोडा छोटा पाव चमचा 

कृती –

कणसाचे दाणे काढून घ्यावे. मिक्सर मध्ये जाडसर वाटून घ्यावे. त्यात मिरची व आल्याची पेस्ट करून टाकावी. कांदा, कोथिंबीर चिरून टाकावे. मीठ, जिरे, कॉर्न फ्लोअर, तांदूळ पीठ, सोडा टाकून एकत्र करावे. तेल गरम करून छोटे छोटे पकोडे तळावे. 

Comments