अचारी पनीर / achari paneer




साहित्य –

१. पनीर २ पाव
२. लाल सुक्या कश्मीरी मिरच्या ६
३. धने २ चमचे
४. बडीशेप २ चमचे
५. जिरे १ चमचा
६. मोहरी १ चमचा
७. मेथीदाणा एक चमचा
८. टमाटे २ मोठे
९. शिमला मिरची १ मोठी
१०. आले लसूण पेस्ट २ चमचे
११. कलौंजी अर्धा चमचा
१२. हिंग अर्धा चमचा
१३. हळद अर्धा चमचा
१४. लाल तिखट आवश्यकतेनुसार
१५. साखर अर्धा चमचा
१६. फेटलेले दही पाउण वाटी
१७. तेल ३ चमचे
१८. मीठ चवीनुसार
१९. कोथिंबीर अर्धी वाटी 

कृती –

प्रथम लाल मिरच्या, धने, बडीशेप, जिरे, मोहरी, मेथीदाणा सर्व २ मिनिटे भाजून घ्यावे. मिक्सर मध्ये बारीक पावडर करावी. टमाटे व शिमला मिरचीची बारीक पेस्ट करून घ्यावी. एका भांड्यात तेल गरम करून त्यात कलौंजी, हिंग परतावे. त्यात आले लसूण पेस्ट टाकून हळद, तिखट परतावे. टमाटे-शिमला मिरचीची पेस्ट टाकून ३ मिनिटे परतावे. आता मसाल्याची पावडर, मीठ, फेटलेले दही, साखर टाकून तेल सुटेपर्यंत परतावे. आवश्यकता वाटल्यास थोडे पाणी टाकावे. पनीरचे तुकडे टाकून २ मिनिटे शिजवून gas बंद करावा. वरून कोथिंबीर पेरावी.

Comments