भरली ढेमसी / stuffed tinda




साहित्य –

१. कोवळी ढेमसी ७
२. तिखट १ चमचा
३. मीठ चवीनुसार
४. आमचूर पावडर १ चमचा
५. कांदा १ मोठा
६. टमाटे २
७. मिरच्या ५
८. आले लसूण पेस्ट २ चमचे
९. मोहरी पाव चमचा
१०. जिरे अर्धा चमचा
११. गरम मसाला एक चमचा
१२. धणेपूड १ चमचा
१३. तेल ३ चमचे
१४. कोथिंबीर अर्धी वाटी
१५. जिरेपूड अर्धा चमचा 

कृती –

ढेमसी धुवून घ्यावी. त्याला उभी व आडवी चीर पाडावी. एका भांड्यात तिखट, मीठ, आमचूर पावडर, गरम मसाला, धणेपूड, जिरेपूड एकत्र करावे. व चीरांमध्ये भरावे. एका कढईत तेल तापवून त्यात मोहरी, जिरे तडतडू द्यावे. मिरच्यांना चिरा पाडून फोडणीत टाकावे. आले लसूण पेस्ट टाकावी. आता ढेमसी टाकून मंद gas वर झाकण ठेवून ५ मिनिटे शिजू द्यावे. कांद्याचे व टमाट्याचे मोठे काप करून कढईत टाकावे. थोडेसे ढवळून परत झाकण ठेऊन शिजू द्यावे. ढेमसी शिजल्यावर gas बंद करून वरून कोथिंबीर पेरावी.

Comments