व्हेज सूप / veg soup




साहित्य –

१. शिमला मिरची अर्धी वाटी
२. शिमला मिरची अर्धी वाटी
३. बेबीकॉर्न अर्धी वाटी
४. ब्रोकोली अर्धी वाटी
५. फरसबी अर्धी वाटी
६. मशरूम अर्धी वाटी
७. कांदा १
८. लसूण पाकळ्या ७-८
९. मिरपूड अर्धा चमचा
१०. मीठ चवीनुसार
११. चिली गार्लिक सॉस २ चमचे
१२. बटर २ चमचे
१३. ऑलिव्ह ऑईल ३ चमचे
१४. कॉर्नफ्लोअर ५ चमचे
१५. कोथिंबीर पाव वाटी 

कृती –

सर्व भाज्या धून चिरून घेणे. एका पातेल्यात १ लिटर पाणी गरम करायला ठेवणे. उकळी आल्यावर त्यात शिमला मिरची, बेबीकॉर्न, ब्रोकोली, फरसबी, मशरूम टाकून ३ मिनिटे शिजवून घेणे. मग सर्व पाणी गाळून भाज्या वेगळ्या ठेवणे. एका पातेल्यात बटर व ऑलिव्ह ऑईल टाकून त्यात लसूण व कांदा परतून घेणे. मग सर्व भाज्या टाकून वरील पाणी टाकणे. एका वाटीत पाणी घेऊन त्यात कॉर्नफ्लोअर टाकून ढवळून ही पेस्ट भांड्यात टाकणे. ढवळत राहणे. आता त्यात चिली गार्लिक सॉस, मिरपूड टाकून १ मिनिट शिजू देणे. gas बंद करून कोथिंबीर टाकून गरम सर्व्ह करणे.

Comments